Jagtap Masale

OUR STORY

नमस्कार मी समर्थ जगताप. जगताप मसाले या छोट्याशा कंपनीचा सर्वेसर्वा. माझे वय 22 . व्यवसाय चालू केला तेव्हा मी 18-19 वर्षाचा होतो. माझं असं काही स्वप्न नव्हतं की मी व्यवसायिक व्हावा वगैरे पण दहावी झाल्यानंतर दहावी अकरावीच्या काळात मला व्यवसायाचा किडा चावला मलाही वाटलं की मी व्यवसाय करावा पण कोणता व्यवसाय करायचा असा काही प्लॅन नव्हता मग जेव्हा मी अकरावी पास आऊट झालो तेव्हा मी बेंगलोर दिल्ली सारख्या सिटीत मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीत फिरलो आणि व्यवसायाच्या शोधात होतो . मग तेव्हा मी कॅफेच्या शोधात होतो कॅफे टाकायचा हे माझा तेव्हा प्लॅन होता . पण घरच्या परिस्थितीमुळे मी टाकू शकलो नाही.

मग मी बेंगलोर वरून परत आल्यावर मी असाच विचार करत बसल्यावर आमचे एक छोटस शॉप आहे छोटेसे स्टेशनरी शॉप आहे मग तिथे मी गल्ल्यावर बसायचो मग एक असाच कस्टमर आला त्याने मला काळा मसाल्याची मागणी केली काळा मसाला भेटेल का आपल्याकडे असं विचारलं तेव्हा मी त्याला नाही म्हणलो आणि आमच्या शेजारी एक किराणा दुकान होतो मी त्याला तिथे पाठवलं. मग असंच बसल्यावर माझ्या डोक्यात आले की माझी आई सरोजा जगताप आमच्या घरी मसाला कांडून द्यायची आमच्या घरी कांडप आहे मसाले मिरच्या काढायचं . मग मी घरी गेल्यावर मम्मीला विचारलं की मम्मी अशा मिरच्या आणल्या तर आपण काढू शकेल का ते विकू शकेल का पण मम्मीला काय माहिती नव्हतं की मी व्यवसायाच्या दृष्टीने विचारतोय.

मग असंच मी थोडं त्याच्यावर रिसर्च वगैरे केलं आणि मग थोडासा बाजार आणून मी मसाला विक्रीची सुरुवात केली.मला आठवतं की तेव्हा माझं 2000 बजेट होतं त्यात मी 1300 चा बाजार आणला होता 200 रुपयाचा प्लास्टिक आणून 400 ते 500 रुपये स्टिकर्स छापले होते जगताप नावाचे आणि पॅकिंग साठी शेजारी आमच्या एक शॉप होतं तिथून पॅकिंग मशीन थोड्या दिवसासाठी मी घेतली होती. आईने मसाला कांडून मला दिला मी पॅक वगैरे करून स्टिकर्स वगैरे लावले आणि आमच्या गावाच्या शेजारी असलेल्या MIDC चिंचोली एमआयडीसीत मी गेलो. 28/6/2022 रोजी पहिल्यांदा विक्रीला गेलो म्हणजे माझ्या कंपनीची स्थापना. पहिल्या दिवसाचा सेल होता 1480 आणि त्यातला माझा पहिल्या दिवसाचा प्रॉफिट होतो 360. पहिल्या दिवशी अत्यंत उत्तम असा रिस्पॉन्स भेटला.

अशी माझी व्यवसायाची सुरुवात झाली आज जवळजवळ 3 वर्ष होऊन गेले या काळात बऱ्याचशा अडचणी आल्या चढ उतार आले पण मी व्यवसाय हा चालू ठेवला यात खूप जणांनी मला सहकार्य केले माझे आई वडील, माझे चुलते, माझे शिक्षक, आणि माझे चांद्यापासून ते बांधापर्यंत लाभलेली मित्र.

3 वर्षापूर्वी लावलेलं मी एक रोपट आज हळूहळू ते वाढतंय येणाऱ्या काळात ते एक बलाढ्य वृक्ष होईल याची मला खात्री आहे येणाऱ्या काळात माझं स्वप्न आहे की आज एव्हरेस्ट, सुहाना , एमडीएच मसाल्याच्या नावाजलेल्या कंपन्या आहेत येणाऱ्या काळात जगताप हे नाव सुद्धा तेवढेच मोठे असेल.

तुम्ही माझा हा प्रवास वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल धन्यवाद...!